आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अमेरिकी विमान कंपनी बोइंगच्या ड्रीमलायनर 787 विमानांची जगभरातील उड्डाणे तात्पुरते रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाकडे सहा तर विविध देशांकडे 50 ड्रीमलायनर विमाने आहेत. जपानमध्ये ड्रीमलायनर विमानांत तांत्रिक दोष आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. अमेरिकी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) बिघाड दुरुस्त होईपर्यंत विविध हवाई प्रवासी वाहतूक कंपन्यांना उड्डाणे रोखण्याचे निर्देश दिले आहेत. ड्रीमलायनर विमानाच्या बॅटरीत दोष आहे, त्यामुळे विमानाला आग लागण्याचा धोका आहे. या विमानाची किंमत 1100 कोटी रुपयांहून अधिक आहे. याआधी बुधवारी जपानमध्ये निप्पॉन एअरवेज कंपनीच्या एका विमानातील बॅटरी बिघडल्यामुळे विमान आणीबाणीच्या स्थितीत उतरवणे भाग पडले होते. यानंतर निप्पॉनने सर्व 24 विमानांची उड्डाणे स्थगित केली आहेत.
ग्रीन सिग्नलनंतरच उड्डाण : अजित सिंह
भारतात विमान नियामक डीजीसीए अरुण मिश्रा यांनी एअर इंडियाला ड्रीमलायनरचे उड्डाण रोखण्यास सांगितले आहे. अमेरिका विमान नियामक आणि डीजीसीएने हिरवी झेंडी दाखवल्याशिवाय ड्रीमलायनरचे उड्डाण होणार नाही, असे हवाई वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी म्हटले आहे.
एअर इंडियाच्या सेवेवर परिणाम नाही
ड्रीमलायनर विमानांचे उड्डाण रोखल्यामुळे एअर इंडियाच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीच्या अधिका -या नी सांगितले. ड्रीमलायनर विमाने दुबई, पॅरिस आदी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरली जात होती. आता त्यांच्याजागी बोइंग 777 विमानांचा वापर होणार आहे.
भारतात कोठे होतो या विमानाचा वापर
एअर इंडियाकडे सहा ड्रीमलायनर विमाने आहेत. त्यातील तीन दिल्ली-कोलकाता, दिल्ली- चेन्नई, दिल्ली-बंगळुरू या मार्गावर वापरली जात होती. विदेशात दिल्लीहून दुबई आणि फ्रँकफर्टच्या उड्डाणांसाठी हे विमान वापरात आहे. एक ड्रीमलायनर राखीव ठेवले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.