वॉशिंग्टन - नव्या संशोधनानुसार अतिगोड पेयांमुळे कुमारवयीन मुलांना स्मरणशक्तीविषयक समस्या तसेच मेंदूत अस्थिरता उद्भवू शकते. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी पौगंडावस्थेतील उंदरांवर प्रयोग केला असता अतिगोड पेयांमुळे उदरांच्या प्रकृतीवर नकारात्मक परिणाम दिसून आले. शरीराच्या जडणघडणीच्या काळात आहारातील पदार्थांचाही मेंदूवर प्रभाव पडतो. मेंदूतील हिप्पोकँपस नावाचा भाग स्मरणशक्ती संवर्धनासाठी वापरला जातो.