आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साधे पाणी प्या,मधुमेह टाळा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मधुमेहापासून दूर राहायचेय? मग थंडगार पेय आणि ज्यूस पिण्याऐवजी साधे पाणी प्यायला सुरुवात करा. साधे पाणी प्यायल्यामुळे चयापचयाच्या विकारांना पायबंद होतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र, या साध्या पाण्यामध्ये गोड पेय मिसळून प्यायल्यामुळे मात्र काहीही फायदा होत नसल्याचे हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांनी जवळपास दशकभर सुमारे 83,000 महिलांच्या पिण्याच्या सवयींचे अध्ययन केले आहे. ज्या महिला गोड पेयाऐवजी केवळ साधे पाणी पितात, त्यांना मधुमेह होण्याचा धोका सात ते आठ टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. फ्रँक हू यांनी म्हटले आहे.

डॉ. हू यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या पथकाने मोठय़ा प्रमाणावर माहितीचे संकलन केले. त्यात 28,902 महिलांच्या आरोग्य आणि जीवनशैलीचा तब्बल 12 वर्षांचा तपशील उपलब्ध झाला. या बारा वर्षांत 2700 महिलांना मधुमेह झाला.

लिंबू पिळून पाणी प्या

मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी थंड पेय किंवा फ्रूट ज्यूसला बिगर शर्करायुक्त कॉफी किंवा चहा हा चांगला पर्याय आहे. कार्बनयुक्त थंड पेय किंवा फ्रूट ज्यूसला पर्याय म्हणून अशी कॉफी किंवा चहा घेतल्यास मधुमेह होण्याचा धोका 12 ते 17 टक्क्यांनी कमी होतो. सोडा किंवा अन्य शर्करायुक्त थंड पेयाला फ्रूट ज्यूस हा काही पर्याय होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या ज्यूसमध्ये सॉफ्ट ड्रिंक इतक्याच कॅलरीज आणि शर्करा असते. या सर्वाला उत्तम पर्याय साध्या पाण्याचा आहे. साधे पाणी प्यायचेच नसेल तर त्यात एखाद्या लिंबाचा रस घालून प्यावे. डॉ. फ्रँक हू, मुख्य संशोधक
मधुमेह, स्टिरॉइड्समुळे वाढतोय काचबिंदू
बाहेर जेवण कराल तर होईल मधुमेह!
चार महिन्यांत केवळ पाच कोटी लोकांची मधुमेह चाचणी