ड्रोन हल्ल्यावरुन ओबामा / ड्रोन हल्ल्यावरुन ओबामा आणि सिनेट सदस्यात हंगामा

वृत्तसंस्था

Dec 31,2011 10:54:17 AM IST

वॉशिंग्टन- पाकिस्तान व येमेनमध्ये करण्यात येत असलेल्या ड्रोन हल्ल्यावरुन ओबामा प्रशासन व सिनेट सदस्यांत हंगामा झाला आहे. तसेच या मुद्यांवरुन व्हाईट हाऊस व सदस्यात तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने व्हाईट हाऊसमधील अधिकारयांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
सिनेट सदस्यांच्या सूचना स्वीकारण्याची मुद्दा व्हाईट हाऊसने फेटाळून लावला होता. सदस्याचा आरोप आहे की, सीआयए आणि लष्कर यांच्या संयुक्त ऑपरेशनमुळे अमेरिकेच्या धोरणावर मोठा परिणाम होत चालला आहे.
बराक ओबामा यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून आतापर्यंत सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात १५०० पेक्षा जास्त संशयित दहशतवादी मारले गेले आहेत. गुप्तचर संघटनेच्या इतिहासातील सर्वात घातक हा कार्यक्रम ठरला आहे.

X
COMMENT