आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमे‍रिकन ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानात पाच ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- अमेरिकी ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानात पाच जण झाले झाले अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील उत्तर वजिरीस्तान या आदिवासी भागात शावल परिसरात ड्रोन हल्ला झाला होता.
गेल्या काही महिन्यांपासून उत्तर वजिररीस्तान भागात दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तानातील अमेरिकी सैन्यातर्फे क्षेपणास्त्रांच्या साह्याने सातत्याने हल्ले चढविण्यात येत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) प्रमुख ले. जनरल झहीर-उल-इस्लाम यांनी अलिकडेच आपल्या अमेरिका दौर्‍यात, ड्रोन हल्ले ताबडतोब थांबविण्याची मागणी केली होती. परंतु अमेरिकेने अद्यात ते थांबविलेले नाहीत.
दहशतवादी तालिबानने काही दिवसांपूर्वी उत्तर आणि दक्षिण वजिरीस्तानमधील पोलिओ लसीकरण मोहिमेवर बंदी घातली होती. जोपर्यंत ड्रोन हल्ले थांबविण्यात येणार नाहीत, तोपर्यंत लसीकरण मोहीम राबविता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.