आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत अल्लाच्या करुणेसाठी इको-फ्रेंडली मशीद खुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- इस्लामिक जगतातील पहिली इको-फ्रेंडली मशीद अल्लाच्या करुणेसाठी खुली करण्यात आली आहे. वक्फ अँड माइनर्स अफेयर्स फाउंडेशनने शुक्रवारी ही घोषणा केली. दीरामध्ये बर सईद स्ट्रीटवर खलिफा अल तजेर ही मशीद बांधण्यात आली आहे. मदिनाच्या क्युबा मशिदीचे इमाम शेख सालेह अल मगमसी यांच्या उपस्थितीत 3500 मुस्लिम बांधवांनी येथे प्रथमच अल्लाची करुणा भाकली.इको-फ्रेंडली मशिदीची वैशिष्ट्ये
> 10,5000 चौरस फूट क्षेत्रात ग्रीन मॉस्कचे डिझाइन करताना ऊर्जा बचत व उपयोगितेचा विचार करण्यात आला आहे.
> ही मशीद बांधताना पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर केला गेला.
> 45,000 चौरस फूट भागात इको-फ्रेंडली साहित्य वापरण्यात आले आहेत. उष्णतारोधक प्रणालीचा वापर केला गेल्याने ऊर्जेचा वापर कमी होणार असून एसीचा वापर त्यामुळे टाळला गेला आहे. परिणामी ग्रीन हाऊस गॅसचा प्रभाव कमी होईल.
> या मशिदीचे बांधकाम अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले आहे.