आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांत दुबई 7 व्या स्थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणांमध्ये दुबई सातव्या स्थानी आहे. मास्टर कार्ड ग्लोबल डेस्टिनेशन सिटीज 2013 ची यादी मंगळवारी जाहीर झाली. त्यात दुबईला हे स्थान मिळाले आहे.
गेल्या वर्षी दुबई शहर आठव्या स्थानी होते. त्यात अधिक सुधारणा झाली आहे. जगातील अव्वल दहा मार्केटमध्ये दुबईचा क्रमांक लागला आहे. विकासाच्या निकषावर शहराचे स्थान निश्चित केले जाते. यंदा दुबईला 90 लाखाहून अधिक पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. आखाती आणि आफ्रिका खंडातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणून दुबईला स्थान मिळाले आहे. यादीत हाँगकाँग, बार्सिलोना, रोम, मिलान यांचाही समावेश आहे. शहर म्हणून दुबई अव्वल आहे. दुसºया स्थानी रियाध आहे, तिसºया स्थानी जोहान्सबर्गचा क्रमांक आहे. आघाडीच्या आशियाई देशांत बँकॉक शहराचा समावेश झाला आहे. लंडन, पॅरिस, सिंगापूर, न्यूयॉर्क यांचा अव्वल पाचमध्ये समावेश आहे.