दुबई - दुबईमध्ये लवकरच जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल बांधण्यात येणार आहे, असे संयुक्त अरब अमीरातचे शासनकर्ते शेख मोहम्मद यांनी सांगितले. 'मॉल ऑफ द वर्ल्ड' नावाने बांधण्यात येणारा मॉल अनेक टप्प्यात पूर्ण केला जाईल, असे दुबई होल्डिंगचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल्ला-अल-गेरगावी यांनी स्पष्ट केले.
या सुविधा असतील
ऐषोरामाने संपन्न असलेल्या हा कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट जवळ-जवळ साडे सात लाख चौरस किलोमीटरमध्ये शॉपिंग मॉल असेल. याबरोबरच येथे थीम पार्क, फिल्म थिएटर, मेडिकल सुविधासह 100 हॉटेल आणि 20 हजार खोल्या असलेले बिल्डिंग अपार्टमेंट बनवण्या येणार आहे.
18 कोटी लोक येतील असा अंदाज
कॉम्प्लेक्समध्ये सात किलोमीटर पादचारी रस्ता असेल. जो उन्हाळ्यात वरून बंद राहिल. या व्यतिरिक्त एसीमुळे तो थंड राहिल आणि हिवाळ्यात पादचारी रस्तावरून उघडला जाईल. या शॉपिंग मॉलमध्ये प्रत्येक वर्षी 18 कोटी लोक येण्याचा अंदाज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दुबईच्या रियल इस्टेट आणि शेअर बाजारमध्ये वाढ व्हावी यासाठी शॉपिंग मॉल या प्रोजेक्टची घोषणा 18 महिन्यांपूर्वीच करण्यात आली आहे. प्रोजेक्ट केव्हा पूर्ण होईल याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.
पुढे पाहा जगातील सर्वात मोठ्या मॉलची संकल्पीत छायाचित्रे आणि व्हिडिओ...