आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dubai Metro Stations Will Be Changed In Unique Features

दुबई मेट्रोचं रुपडं बदलणार; प्रवाशांना मेट्रो सोडून घरी जावेसेच वाटणार नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- दुबईत जगातील सगळ्यात मोठे मेट्रो नेटवर्क आहे. आता लवकरच दुबई मेट्रोचे रुपडे बदलणार आहे. मेट्रोला आर्ट गॅलरीचे रुप दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चार मेट्रो स्टेशनची निवड करण्‍यात आली आहे. पुढील आठवड्यात या प्रकल्पाच्या कामास प्रारंभ करण्‍यात येणार आहे. विशेष म्हणजे इस्लामी आणि अरबी शैलीत मेट्रोची सजावट करण्यात येणार आहे. पुढील वर्षी राष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पात विनाचालक मेट्रोला आतून बाहेरून सजविले जाईल. त्यामुळे प्रवाशी आर्ट गॅलरी तर बाहेरील लोक मेट्रोचा बाहेरील रं‍गविलेला भाग पाहून भरभरून आनंद लुटणार आहेत.

आपल्याला हे माहीत आहे का?
जगातील सगळ्यात मोठे मेट्रो नेटवर्क दुबईत आहे. दुबईत मेट्रो नेटवर्क जवपास 75 किलोमीटरमध्ये पसरले आहे. मेट्रो नेटवर्कच्या दोन मार्गावर एकूण 48 स्टेशन्स आहेत. गत वर्षी 137 मिलियन अर्थात एक कोटी 37 हजार प्रवाशांनी मेट्रोमधून प्रवास केला होता. दररोज 5 लाखांहून अधिक लोक मेट्रोमधून प्रवास करतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा दुबई मेट्रोचा नजारा...