आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई एअरपोर्ट ठरले जगातील सर्वाधिक रहदारीचे विमानतळ, पाहा INSIDE PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - दुबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाने रहदारीच्याबाबतीत इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळाला मागे टाकले आहे. मागील वर्षी हिथ्रोवर 6 कोटी 81 हजार प्रवाशांनी ये जा केली, तर दुबई इंटरनॅशनल विमानतळावर 7 कोटी 4 हजारानी. ही संख्‍या यंदा वाढून 7.9 कोटी होण्‍याची शक्यता आहे.
आम्ही ऐतिहासिक असा मैलाचा दगड पार केला आहे, असे दुबई विमानतळाच्या प्रशासनाने सांगितले. आमचा पुढील उद्देश हा दुबई हवाई उद्योगात जागतिक केंद्र बनवण्‍याचे स्वप्न आहे, अशी इच्छा विमानतळाचे अध्‍यक्ष शेख अहमद बिन सईद अल मख्‍तूम यांनी व्यक्त केली आहे.
हिथ्रो विमानतळ आपली क्षमता वाढवण्‍यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे, असे हिथ्रोच्या महिला प्रवक्ताने सांगितले.सद्य:स्थितीत विमानतळ आपली क्षमता जवळजवळ 98 टक्के ऑपरेट करत आहे.

दुबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळ
अनेक वर्षांपासून जगातील सर्वात मोठे विमानतळाचा गौरव ब्रिटनकडेच होते. परंतु हिथ्रो मधील क्षमता कमी असल्याकारणाने दुबईकडे हा मुकूट गेला आहे, हिथ्रोच्या प्रवक्ताने सांगितले. एका वर्षात दुबईत प्रवाशांची संख्‍या 6.1 टक्क्यांनी वाढली आहे, असे दुबई विमानतळाने म्हटले आहे.

पुढील छायाचित्रांमधून पाहा दुबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाची सौंदर्य