आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Bloggar German Education Minister;s Degress Taken Away

ब्लॉगरमुळे जर्मन शिक्षणमंत्र्यांची पदवी परत घेतली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - ब्लॉग जगताने जर्मनीच्या शिक्षणमंत्र्यांची डॉक्टरेट पदवी परत घेतली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कॉपी करून पदवी संपादन केली असल्याचे एक ब्लॉगर गेल्यावर्षी सात एप्रिलपासून सातत्याने सांगत होता. यानंतर मंगळवारी जर्मनीच्या शिक्षणमंत्री एनेट शवन यांची डॉक्टरेट पदवी विद्यापीठाने परत घेतली.

एनेट यांना डुसेलडोर्फ विद्यापीठाने 1980 मध्ये ही पदवी प्रदान केली होती. एनेट यांनी शिक्षण व कॅथोलिक थियोलॉजी विषयाचे शिक्षण घेतले आहे. ब्लॉगरने गेल्यावर्षी शवनप्लॅग नावाने ब्लॉग सुरू केला होता. तो मंत्र्यांच्या शोधनिबंधाबाबत रोज नवी माहिती देत होता. मंत्रीणबाईने ब्लॉगमधील माहिती चुकीची असल्याचे म्हटले असून विद्यापीठावर दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. एनेट यांनी शोधनिबंध चोरला असून वास्तवात त्यांनी तो तयार केला नाही, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.