आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To Indian Dress Passengers Traveling Rejected In Dubai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबईत धोतरामुळे मेट्रोप्रवास नाकारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - विदेशात भारतीयाच्या वाट्याला पुन्हा अपमानास्पद वागणूक आली. दुबईत मेट्रो स्थानकावर 67 वर्षीय भारतीयास धोतर घातल्याचे कारण सांगून प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.


या ज्येष्ठ नागरिकाची मुलगी मधुमती यांनी सांगितले की, वडिलांसोबत एतिसलात मेट्रो स्टेशनच्या पंचिंग गेटकडे मी जात होते. तेथे सुरक्षा पोलिसाने आम्हाला रोखले. तुमच्या वडिलांना हा पोषाख घालून मेट्रोमधून प्रवास करता येणार नाही. तशी परवानगी नाही, असे पोलिस म्हणाला. धोतर हा भारताचा पारंपरिक पोशाख असून याआधीही आपल्या वडिलांनी धोतर घालून अनेकदा प्रवास केल्याचे मधुमती यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केले.

परिवहन प्राधिकरणने (आरटीए) मेट्रो प्रवासाचे ड्रेसकोड लागू केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली आहे, असेही मधुमती म्हणाल्या.