आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवघेण्या संसर्गाचा विमान प्रवाशांना धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आपण नियमित हवाई प्रवास करता का? उत्तर होकारार्थी असेल, तर तुम्ही बसता त्या आसनावरील आर्मरेस्टवर लक्ष द्या. संशोधकांनी केलेल्या संशोधनात विविध संसर्गजन्य आजार करू शकणार्‍या जिवाणूंचा संचार आर्मरेस्ट्स, ट्राय टेबल्स, विमानातील आसने आणि अन्य पृष्ठभागांवर आढळून आला आहे.
एमआरएसए आणि ई कोली यांसारखे जिवाणू विमानाच्या केबिन्समध्ये आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपर्यंत राहू शकतात, असे संशोधकांनी सांगितले. विमानातील जास्त गर्दीमुळे संसर्गजन्य आजार होण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त केली जात असल्याचे अबुर्न विद्यापीठातील किरील वेगलेनोव्ह यांनी सांगितले. केबिनच्या पृष्ठभागावरील जिवाणूच्या प्रवाशाला होणार्‍या संसर्गामुळे विमानात जिवाणूला पोषक वातावरण असल्याचे उघड आहे. वेगलेनोव्ह आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दोन पॅथोजेन्स, मेथिसिलिन- रेझिस्टंट स्टॅफलोकोकस अरुयस (एमआरएसए) आणि ई कोली जिवाणूंच्या विमानात जिवंत राहण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला.
जिवाणू 96 ते 168 तास जिवंत
संशोधकांनी सहा वेगवेगळ्या एअरलाइन कॅरिअरचा (आर्मरेस्ट, प्लास्टिक ट्राय टेबल, मेटल टॉयलेट बटण, सीट पॉकेट क्लॉथ आणि लेदर) अभ्यास केला. यामध्ये एमआरएसए सीट बॅक पॉकेटमध्ये जास्तीत जास्त 168 तास, तर ई कोली आर्मरेस्ट व अन्य भागांवर 96 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात.
त्वचेच्या स्पर्शातून आजाराची शक्यता
शरीरातून निघणार्‍या घामामुळे संसर्गजन्य जिवाणू जिवंत राहतात. तसेच त्वचेच्या स्पर्शातून आजार होण्याची जोखीम वाढते, असे वेगलेनोव्ह यांनी सांगितले. विमानातील भविष्यकालीन योजनेत स्वच्छतेमुळे संसर्गजन्य जिवाणूंच्या संख्येत घट पाहिली जाईल. संशोधक अन्य मानवी रोग विषाणूंवर चाचण्या घेत आहेत. यामध्ये टीबीला कारणीभूत ठरणार्‍या जिवाणूचा समावेश आहे. अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रो बॉयोलॉजीच्या वार्षिक बैठकीत संशोधन अहवाल मांडण्यात आला.