आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-सिगारेटचा चार्जिंग करताना स्फोट; थोडक्यात बचावली महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिचमंड- उत्तर यॉर्कशायरमधील एका हॉटेलमध्ये ई-सिगारेटचा स्फोट होऊन एक महिला वेटर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रिचमंड शहरातील 'हॉटेल बक इन'मध्ये हा स्फोट झाला. हॉटेलमधील बार टेंडर लॉरा बॅटी ही या स्फोटात थोडक्यात बचावली. बॅटीचा ड्रेस जळाला असून ती जखमी झाली आहे.

लॉरी बॅटी म्हणाली, ती एका ग्राहकाचे उर्वरित रुपये देऊन परतत होती. तेवढ्यात रुममध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट होताच रुममधील गादी व खिडकीच्या पडद्यांना आग लागली. वेटर लॉरी बॅटीचाही ड्रेस जळाला आणि तिला दुखापत झाली. या स्फोटात संबंधित ग्राहकही जखमी झाला आहे. या ग्राहकाने आयपॅड चार्जरवर ई-सिगारेट चार्जिंगला लावली होती. त्याचा हा स्फोट असल्याचे रिचमंडचे फायर ऑफिसर स्टीव्ह बेक यांनी सांगितले.

स्टीव्ह ब्रेक यांनी ई-सिगारेट स्फोटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्मोक डिटेक्टर नसलेल्या घरांसाठी ई- सिगारेटच्या स्फोटाचा मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.