आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earth Has A Secret Reservoir Of Water, Say Scientists

जमिनीमध्‍येच आहेत पाण्‍याचे गुप्‍त स्‍त्रोत, वैज्ञानिकांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- 150 वर्षापुर्वी पहिले फ्रांन्‍स लेखक जूल्‍स वर्न यांचे विज्ञानावर आधारित 'जर्नी टू द सेंटर ऑफ अर्थ' हे पुस्‍तक बरेच गाजले होते. या पुस्‍तकात पृथ्‍वीच्‍या गर्भातच पाण्‍याचे स्‍त्रोत असल्‍याची काल्‍पनीक कथा होती. या काल्‍पनीक कथेला अधार मिळाला असल्‍याचा दावा काही वैज्ञानिंकांनी केला आहे. बुधवारी जर्नल नेचर या नियतकालीकामध्‍ये कॅनडा विद्यापीठाच्‍या वैज्ञानिकांनी म्‍हटले आहे, की जमिनीच्‍या पृष्‍ठभागाच्‍या खाली 400 ते 600 किलोमिटर अंतरावर मोठे जलाशय असल्‍याचा दावा केला आहे. आज पृथ्‍वीवर जेवढे पाणी आहे, त्‍यापेक्षा जास्‍त पाण्‍याचे स्‍त्रोत जमिनीमध्‍ये आहेत, हे केवळ पाण्‍याचे स्‍त्रोत नसून तलाव असल्‍याचा दावा वैज्ञानिकांचा आहे. जमिनीचा पृष्‍ठभाग आणि पृथ्‍वीच्‍या गर्भात मोठ्या प्रमाणात पाणीसाठे आसल्‍याचा दावा वैज्ञानिक ग्राहम पियर्सन यांनी केला आहे.