आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर पृथ्वीचे वातावरण भाजून निघाले असते, सौरज्वाळांतून धरणी थोडक्यात बचावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- गेल्या वर्षी 23 जुलै रोजी अतिविशाल सौरज्वाळेतून आपली पृथ्वी थोडक्यात बचावली, अशी धक्कादायक कबुली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिली आहे. गेल्या दिडशे वर्षांमध्ये पहिल्यांदाच सूर्यावर आलेल्या भयंकर वादळामुळे ही सौरज्वाळा तयार झाली होती. सौरज्वाळा तयार होत असताना तिचे तोंड पृथ्वीच्या दिशेने होते. परंतु, आठवड्यात तिची दिशा बदलली आणि आपली धरणी वाचली.
सूर्यावर आलेल्या भयंकर वादळासंदर्भात माहिती देताना कोलोरॅडो विद्यापिठाचे संशोधक डॅनिअल वेकर म्हणाले, की जर सौरज्वाळा पृथ्वीवर आदळली असती तर आजही आपण तुकडे गोळा करीत असतो.

यासंदर्भात न्युयॉर्क पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे, की आपण सुदैवाने सौरज्वाळेच्या महासंकटातून बचावलोय. आठवडाभरापूर्वी तिचे तोंड पृथ्वीच्या दिशेने होते. जर सौरज्वाळा आठवडाभरापूर्वी झेपावली असती तर पृथ्वीचे वातावरण भाजून निघाले असते.
ही सौरज्वाळा एवढी मोठी होती, की आपण पुन्हा डार्क एजमध्ये गेलो असतो.
शास्त्रज्ञांनी सांगितले आहे, की जर एवढी विशाल सौरज्वाळा पृथ्वीवर आदळली असती तर कम्युनिकेशन नेटवर्क, जीपीएस, सॅटेलाईट्स आणि इलेक्ट्रिकल ग्रीड विस्कळित झाले असते. यासह इतरही नुकसान सहन करावे लागले असते. 21 व्या शतकातील या पायाभुत सुविधा पुन्हा नव्याने उभारण्यासाठी कित्येक वर्षे लागली असती.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, काय आहेत सौरज्वाळा...