आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये भूकंप, तीन हजारांहून घरांची पडझड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या युन्नान प्रांताला रविवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यात 30 लोक जखमी झाले. 700 घरे जमीनदोस्त झाली असून तीन हजारांवर घरांची पडझड झाली.
रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 एवढी नोंदवण्यात आली. भूकंपानंतर छोटे 34 धक्क जाणवले. म्यानमारजवळील अर्युआन भागात दुपारी 1 वाजून 41 व्या मिनिटाला भूकंप जाणवला. त्याचे केंद्र भूगर्भात नऊ किलो मीटर खोल आहे. भूकंपाचा परिणाम सुमारे 55 हजार लोकांवर झाला आहे. घटनेनंतर मदतकार्याला सुरूवात झाली आहे. या भागात 6 हजार तात्पुरते निवारे तयार करण्यात आले आहेत. प्रांताच्या भूकंप विभागाने घटनेला तिसºया श्रेणीतील आपत्कालीन स्थिती असल्याचे जाहीर केले आहे.