आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामधील दलबंदीन परिसर आज (मंगळवार) सायंकाळी आलेल्या प्रलयकारी भूकंपाने हादरला. यात सुमारे 208 नागरिक मृत्युमुखी पडले असून अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचे धक्के पाकिस्तानमधील जवळपास सर्व शहरे आणि उत्तर भारतात जाणवले आहेत.
आग्नेय दलबंदीन परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दलबंदिनपासून सुमारे 145 किलोमीटर दूरवर केंद्रबिंदू असल्याचे समजते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 मोजण्यात आली. सुमारे दोन मिनिटे भूकंपाचे धक्के जाणवत होते, असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. यात अनेक घरांची पडझड झाली असून त्याखाली अनेक लोक दबले असण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
दिल्लीसह उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे काही भागांत नागरिक इमारतींबाहेर आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.