आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के, 150 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये रविवारी दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. यात 150 चिनी नागरिक मृत्युमुखी पडले, तर अनके जणजखमी झाले. युनानमधील झाओटोंग शहरात रविवारी साडेचार वाजता 6.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला असून यामुळे 12 किलोमीटर परिसराला हादरा बसला, तर भारत-नेपाळ सीमेवरील झिगॅझ येथे 5 रिश्टर स्केलचा धक्का बसला. मात्र, या धक्क्यामुळे हजारो लोक घरातून बाहेर पडले. वीजपुरवठा खंडित झाला तसेच दूरसंचार सेवाही काही काळ ठप्प झाली. भूकंपाचा धक्का जाणवताना हलत्या बोटीत बसल्याचा अनुभव काही चिनी नागरिकांनी सांगितला.
(फोटो : भूकंपात जखमी झालेल्या एका बालकाला घेऊन जाताना बचाव पथकातील कर्मचारी)