आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान पुन्हा हादरला; 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप, 15 ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- सिंध व बलुचिस्तान भाग शनिवारी भूकंपाच्या मोठ्या धक्क्याने हादरले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.2 एवढी नोंदवण्यात आली. यामध्ये 15 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

याच भागात झालेल्या भूकंपाच्या तीन दिवसांनंतर हे हादरे बसले आहेत. तीन दिवसांपूर्वीच्या भूकंपात 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

बलुचिस्तानच्या पश्चिमेकडील खुझदारपासून 150 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र असल्याचे पाकिस्तानच्या हवामान विभागाचे प्रमुख मोहंमद रियाझ यांनी सांगितले. देशाच्या हवामान केंद्राकडे या भूकंपाची तीव्रता 7.2 एवढी नोंदवण्यात आली. कराची व क्वेट्टा या शहरात हादरे बसल्यानंतर लोक आपले घर व दुकाने सोडून पळाले.

बलुचिस्तानच्या आवारान जिल्ह्यात आणखी कोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत, याची संपूर्ण माहिती बचाव पथकाला अद्याप मिळालेली नाही.