आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुग्रहापासून पृथ्वी बचावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगभरातील लोक जेव्हा गाढ झोपेत होते, तेव्हा सुमारे 2.7 किलोमीटर आकाराचा एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला. त्याचे नाव 1998 क्यूई-2 असून रात्री 2 वाजून 29 वाजता तो पृथ्वीपासून 58 लाख किलोमीटर दूरून गेला. हे अंतर फेब्रुवारीत पृथ्वीच्या जवळून जाणा-या अस्टेरॉइडच्या तुलनेने 200 पट अधिक होते. परंतु क्यूई-2 फेब्रुवारीच्या लघुग्रहापेक्षा आकाराने 50 हजार पट मोठा होता. त्याच्या गुरुत्वबलामुळे वेगळ्या झालेल्या उल्का चंद्राच्या चारी बाजूने परिक्रमा करत आहे. आता असे दृश्य 200 वर्षांनंतर पाहायला मिळेल.


6.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाविनाश घडवणा-या अस्टेरॉइडच्या एक तृतीयांश एवढा या लघुग्रहाचा आकार होता. अस्टेरॉइड कोसळल्यामुळे पृथ्वीवर डायनोसॉर युगाचा अंत झाला होता. हा लघुग्रह अतिशय मोठा होता, असे बेलफास्टच्या क्विन्स विद्यापीठाचे प्रोफेसर अ‍ॅलन किट्जसिमन्स यांनी सांगितले.


6.5 कोटी वर्षांपूर्वी काय घडले होते
6.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अनेक भागात 9 किलोमीटर आकाराचा अस्टेरॉइडने धडक मारली होती. मेक्सिकोच्या चिकशलूब नावाच्या परिसरात तो धडकला होता. यामुळे झालेल्या स्फोटात संपूर्ण जगात महाभयंकर वादळ आले. संपूर्ण आकाश झाकोळले गेले. सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. तापमानाची पातळी घसरत गेली. त्यातूनच डायनोसॉर युगाचा शेवट झाला.