आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला भूकंपाचा तडाखा; 90 ठार, जम्‍मू-काश्मिरही हादरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनला सोमवारी भूकंपाचा जोरदार तडाखा बसला. या घटनेत 90 ठार, तर 600 जण जखमी झाले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.6 एवढी नोंदवण्यात आली. वायव्येकडील गांसू प्रांतासह परिसर त्यामुळे हादरला.
गांसू प्रांतातील मिनक्शियन व झांगक्शियन भागात सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला.

भूकंपाचे केंद्र बेइडोपासून पश्चिमेला 151 किलोमीटर अंतरावर 9.8 किलोमीटर खोल आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील झाडे कोसळली. अनेक घरांची पडझडही झाली. या पडझडीमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सरकारकडून घटनास्थळी तत्काळ बचाव पथक पाठवण्यात आले. त्याचबरोबर सुरक्षा जवान, पोलिसांचा 300 जणांचा ताफा घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. निर्वासित नागरिकांसाठी 500 छावण्यांची व्यवस्था करून देण्यात आली आहे. एक हजार कुटुंबांना आणीबाणीच्या काळातील किट देण्यात आले आहे. याशिवाय इतर भागातूनही हादरा बसलेल्या परिसरात जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात येत आहेत. शांक्शी या शेजारील प्रांतातही भूकंपाचे हादरे जाणवले. उंच इमारतीच्या 31 व्या मजल्यावरही त्याचे धक्के जाणवल्याची माहिती शिआन शहरातील ली नावाच्या एका नागरिकाने दिली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जखमींची संख्या 296 वर गेली आहे. डिंग्झी शहरासह इतर भागात आगामी काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे चीनचे सुमारे 1 हजार 925 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.