आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशिया भूकंपाने पुन्हा हादरले; त्सुनामीची शक्यता नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- इंडोनेशिया शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले. भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्चर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सुलावेसी बेटाजवळ होता, अशी माहिती अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षण केंद्रातर्फे देण्यात आली आहे. परंतु भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानीची माहिती मिळू शकली नाही.
भूंकपाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टांवरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्सुनामीची शक्यता नसल्याचेही अमेरिकी पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. भूकंपाचे धक्क जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.