आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : चीन भूकंप बळीचा आकडा 400 वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या दक्षिण पश्चिमी युनान प्रांतात रविवारी झालेल्या भीषण भूकंपातील बळींची संख्या 400 च्या घरात पोहोचली आहे. सुमारे 2,500 सैनिक मदत व बचाव कार्यात तैनात आहेत. आतापर्यंत 1,800 हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांचा लाइफ डिटेक्टरच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मदत पथकाला इमारतींच्या ढिगार्‍यांतून रस्ता तयार करून पुढील कामे करावी लागत आहेत.

ढिगार्‍याखाली अजूनही हजारो लोक अडकले आहेत. भूकंप आणि भूस्खलनामुळे 10 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरितांसाठी चीन सरकारने तंबू व छावण्यांची सोय केली आहे. यापूर्वी 1970 मध्ये यूनान प्रांतात 7.7 रिश्टर क्षमतेचा भूकंप आला होता. त्यात 15 हजारांहून अधिक चिनी नागरिकांचा बळी गेला होता. रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.5 एवढी मोजण्यात आली होती.
पुढील स्लाइड्स मध्ये भुकंपानंतरची विदारक स्थिती...