आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठा भूकंप, इराणध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणपासून पाकिस्तानपर्यंत आणि उत्तर भारतातही अनेक ठिकाणी भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणमध्ये गेल्या ४० वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इराणमध्ये १९७८ साली ७.८ एवढ्या तीव्रतेचे भूकंपांचे झटके जाणवले होते. त्यात १५ हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. इराणच्या शासकीय वृत्तवाहिनीनुसार मंगळवारच्या भूकंपात ४० हून अधिक लोक दगावले आहेत. सर्वाधिक नुकसान दक्षिण इराणमध्ये झाले आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे.

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात भूकंपाच्या बळींची संख्या सातवर गेली आहे. त्यात तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे जवळपास हजार घरे कोसळली असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

छायाचित्र - कराचीमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर लोक ऑफीसमधून बाहेर आले होते.