आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक निवडणुकीत गिलानींच्या मुलाचे अपहरण तर हुकुमशाहांचे झाले बुटांनी स्वागत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतात 16 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्तेसाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काट्याची लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक काळात हिंसक घटना घडण्याची शक्यता असताना निवडणूक आयोग ही यंत्रना कशाप्रकारे हातातळत असावा, अशा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. या पार्श्वभूमीवर 'इकोनॉमिस्ट मॅगझीन'ने भारतीय निवडणूक आयोगाची प्रशंसा करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

भारतात सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे कशा प्रकारे पार पाडल्या जातात, हा एक संशोधनाचा विषय असल्याचेही इकोनॉमिस्ट मॅगझीनने म्हटले आहे. भारताचा पारंपारिक प्रत‍िस्पर्धी असलेला पाकिस्तान नेहमी कुरघोडी करताना दिसतो. सध्या भारतातील निवडणुकीबाबत पाक मीडियातून उलटसूलट चर्चा सुरु आहे. परंतु पाकमध्ये मागिल निवडणुकीत प्रचंड हिंसा झाली होती. पाकची राजधानी असलेल्या कराची शहरात बॉम्बस्फोट आणि खैबर पख्तूनख्वांमध्ये गोळीबाराची घटना घडली होती.

2008 मध्ये माजी पंतप्रधान नजीर भुट्टो यांची हत्या करण्‍यात आली होती. त्यानंतर देशात आणि राजकारणात लोकशाहीला धक्का पोहोचणार नाही याबाबत शपथ घेण्यात आली होती. तरीदेखील मागिल निवडणुकीत पाकिस्तानात विचित्र घटना घडल्या होत्या. आंतरराष्‍ट्रीय मीडियात त्यावरून खूप चर्चाही झाली होती.

पुढील स्लाइड्वर क्लिक करून जाणून घ्या, नेमके काय घडले होते पाकिस्तानात...