आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earthquake Strikes In Chile And Papua New Guinea

चिलीसह पापुआ न्यू गिनी शक्तिशाली भूकंपाने हादरले, जीवितहानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंटियागो- दक्षिण अमेरिकेतील चिली आज (शुक्रवार) पुन्हा एकदा भूकंपाने हादरले. हवामान विभागानुसार, पहाटे पाच वाजून 32 मिनिटांनी आलेल्या भूकंपाती 6.1 रिश्टर स्केल तीव्रता होती. भूकंपाचा केंद्र दक्षिणेकडे 10 किलोमीटर अंतरावर आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील पापुआ न्यू गिनीतही 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्र पांगुना शहरापासून जवळपास 54 किलोमीटर अंतरावर असल्याचे अमेरिकन भूगर्भीय शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्सुनामीची शक्यता नसल्याचे वार्निंग सेंटरने सांगितले आहे. भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.