आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताटातील घासन् घास खा नाही तर दंड भरा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जपानमधील सपोरो येथील हाचियाको रेस्टॉरंटमध्ये एक नवा नियम लागू केला आहे. या रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर तुमच्या ताटातील अन्न तुम्ही पूर्ण संपवले नाही तर त्यासाठी दंड भरावा लागणार. हा नवा नियम जपानच्या खास सूको मेसी या डिशसाठी लागू करण्यात आला आहे. एक वाटीभर भात, त्यावर सॉमन रॉ फिश असलेली ही डिश जपानमध्ये खूप लोकप्रिय ठरली. ऑर्डर केल्यानंतर ही डिश तुम्ही पूर्ण संपवली नाही तर तुम्हाला त्याची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

रेस्टॉरंटने या मेन्यूसाठी असा नियम लागू करण्यामागील कारण सांगितले की, हे मासे पकडण्यासाठी मच्छीमारांना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा एवढी जोखीम असते की मच्छीमारांना जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे मच्छीमारांचा आदर आणि प्रोत्साहन देण्यासाठी रेस्टॉरंटने हे पाऊल उचलले आहे. कष्टाने बनवलेले अन्नपदार्थ देताना ग्राहकांना जागरूक करण्याचे रेस्टॉरंटचे धोरण आहे. तसेच जगभरात केल्या जाणा-या अन्नाच्या नासाडीविरोधात आणि अन्नसंकटाविषयी ते लोकांना जागरूकही करतात.
bigthink.com