आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात एकदा तरी खावा ‘मसाला डोसा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अस्सल खवय्यांसाठी ही अगदी खमंग बातमी आहे. कारण भारतीय पदार्थात मानाचे स्थान असलेल्या ‘मसाला डोसा’ ला अमेरिकेने सलाम केला आहे. एका वृत्तपत्राने तयार केलेल्या टॉप टेन पदार्थांच्या यादीत मसाला डोसाचा समावेश झाला आहे. आयुष्यात येऊन दहा पदार्थ जरूर खावेत, असे सांगणारी ही यादी आहे.
हफिंग्टन पोस्टने जगातील चवदार पदार्थांचा मेन्यू यादीत उतरवला आहे. प्रत्यक्षात व्हिएटर या ब्लॉगने यादी तयार करण्याचे काम केले. त्यासाठी जगभरातील डिशेसचा अभ्यास करण्यात आला. जे पदार्थ खरोखरच खावेत असे आहेत, त्या पदार्थांसाठी ‘मस्ट ट्राय’ चा सल्ला देण्यात आला आहे. चीनचा पांढरा बदकाचे चिकन, अमेरिकेचे बीबीक्यू, जपानचा टेपान्याकी या पदार्थांचा टॉप टेनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
तांदूळ व डाळीच्या मिश्रणातून तयार होणारा पदार्थ म्हणजे अगदी पातळ कागदासारखाच असतो. गरम तव्यावर त्याची योग्य भाजण महत्त्वाची असते. या पदार्थातील मसाला त्याची लज्जत वाढवणारा ठरतो. बटाटे, कांदा, अद्रक, चटणी यामुळे त्याची चव लक्षात राहणारी ठरते, अशा शब्दांत हफिंग्टन पोस्टच्या वेबसाइटमध्ये मसाला डोशाचे वर्णन करण्यात आले आहे. यादीत फ्रान्सच्या एस्कारगॉट्स या पदार्थाचा समावेश आहे. हा पदार्थ मांसाहारी आहे. तो गोगलगायीपासून तयार करण्यात येतो. ग्रीकच्या पारंपरिक शाकाहारी मौस्साका या पदार्थालाही यादीत स्थान मिळाले आहे. पनीरपासून तयार होणारा हा पदार्थ आहे. झुचिनी (इटली), लाक्सा (मलेशिया), सॉम टाम (थायलंड), पपाया सलाड (आॅस्ट्रेलिया), पावलावा (न्यूझीलंड) हे पदार्थही त्यात समाविष्ट आहेत.
केवळ लोकप्रिय पदार्थांना ट्राय करण्यापेक्षा काही स्थानिक पदार्थांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण या पदार्थांमुळे आपण नवे मित्र जोडू शकतो. कारण खाद्यपदार्थ व पर्यटन या हातात हात घालून चालणाºया गोष्टी आहेत, असे हफिंग्टन पोस्टने म्हटले आहे.