आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ebola: 5 Thousand 177 Death Recorded World Health Organistion

इबोला विषाणुंने घेतले 5 हजार 177 लोकांचा बळी - जागतिक आरोग्य संघटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीनिव्हा - आतापर्यंत आठ देशांमध्‍ये इबोलाने 5 हजार 177 लोकांचा मृत्यू झाला असून 14 हजार 413 संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी(ता.14) सांगितले. बुधवारी(ता.12) आरोग्य संघटनेने मृताचा आकडा 5 हजार आणि 14 हजार 98 इबोला संसर्गाची नवी प्रकरणे समोर आली असल्याचे स्पष्‍ट केले.जीवघेण्या इबोलाचा फैलाव गिनी, लायबेरिया आणि स‍िएरा लिओनमध्‍ये मोठ्याप्रमाणावर चालू आहे. परंतु लायबेरियाच्या राजधानीत ताज्या आकडेवारीनुसार विषाणूचा फैलाव क्वचित मंदावला आहे. तसेच देशातील आणीबाणी समाप्त करण्‍यात आली आहे.

डब्ल्यूटीओने सांगितले, की नोव्हेंबर महिन्यात 1लाख 2 हजार 812 लोकांचा इबोलाने मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरमध्‍ये 2 हजार 836 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून त्याचे पुनर्वर्गीकरण केले जाणार असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. माली या देशात नुकतेच इबोलाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यत येथे चार प्रकरण पुढे आली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला. नायजेरिया आणि सेनेगलमध्‍ये काही फरक नाही. दोन्ही देश इबोला मुक्त म्हणून जाहीर करण्‍यात आले आहे.