आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ebola Cases Could Eventually Reach 20,000 , Says World Health Organization, Divya Marathi

Ebola चे 20 हजार रुग्ण, जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीन‍िव्हा - पश्चिम आफ्रिकेत इबोलाच्या रूग्णांची संख्‍या 20 हजारांची संख्‍या पार केली आहे, असे आंतरराष्‍ट्रीय आरोग्य संघटनेने (डब्ल्यूटीओ) सांगितले आहे. आरोग्य संघटना इबोलाच्या प्रतिबंधासाठी नवीन रणनीती बनवत आहे.
रुग्णांची संख्‍या ही सध्‍या उपलब्ध होत असलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते. गुरुवारी ( ता. 28) डब्ल्यूटीओने नवीन आकडेवारी प्रसिध्‍द केली. त्यानुसार 1 हजार 552 जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे 3 हजार 69 नवे कसेस लायबेरिया, सिएरा लिओन, गिनी आणि नायजेरिया नोंदवली गेली आहे. मागील तीन आठवड्यांमध्‍ये 40 टक्के नवे रुग्ण आढळली आहेत. इबोलाचा उद्रेक वाढतच आहे, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
लायबेरियातील प्रवासाशी संपर्क आलेला एक व्यक्ति आणि संसर्ग झालेल्या डॉक्टरची दक्षिण नायजेरियात मृत्यू झाला. सहावा बळी नाजयेरियाच्या आर्थिक राजधानीच्या बाहेर गेला. अद्यापही आफ्रिकेच्या सर्वाधिक लोकसंख्‍या असलेल्या देशातून इबोला हद्दपार करण्‍यास यश आलेले नाही.