न्यूयॉर्क - अमेरिकेच्या प्रतिष्ठित टाइम मॅगझीनने Person of the Year पुस्कारांची घोषणा केली आहे. इबोला प्रभावित भागात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करणा-या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे टाइम मॅगझीनने सांगितले. या पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जावा यासाठी टाइमने सर्वाधिक वेळेस चर्चेत राहिलेल्या व्यक्तींची निवड केली होती. तसेच त्या व्यक्ती ज्यांच्या कामामुळे इतरांचे जीवन वाचले अशा व्यक्तींच्या नावाची यादी करण्यात आली होती.
तत्पूर्वी, हा पुस्कार भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना देण्यात यावा अशी शिफारस मॅगझीनच्या ऑनलाइन रिडर्सने पोलच्या माध्यमातून केली होती. परंतु, मॅगझिनच्या संपादकांनी इबोला या महाभयंकर आजाराशी लढा देणा-या व्यक्तींना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.
या पुरस्कारासाठी अंतिम नावांमध्ये अमेरिकेतील फर्ग्युसनमधील प्रदर्शन करणा-या व्यक्ती, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे उद्योगपती जॅक मा, अॅप्पलचे सीईओ टिम कुक आणि
इराकी कुर्दिश लीडर मसूद बरजानी यांची नावे होती. मागच्या वर्षी हा पुस्कार पोप यांना देण्यात आला होता.
टाइम मॅगझीनच्या Person of the Year शी निगडित बातम्या वाचण्यासाठी येथे
येथे क्लिक करा
क्लिक करा.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...