आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'इबोला फायटर्स\' ठरले \'Person of the Year\' पुरस्काराचे मानकरी, \'TIME\' ने केली घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मॅग्झिन चे कव्हर पेज)

न्यूयॉर्क- 'इबोला' व्हायरस प्रभावित भागात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांची दिवसरात्र सेवा करणारे फायटर्स अर्थात 'इबोला नर्सिंग स्टाफ' अमेरिकेतील प्रतिष्ठित 'टाइम' मॅग्झिनचा 'पर्सन ऑफ द इयर'चा पुरस्कारचा मानकरी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील 'रीडर्स पोल'ने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'पर्सन ऑफ द ईयर'साठी पसंती दिली होती. मात्र, 'टाइम'च्या संपादकीय पॅनलने जाहीर केलेल्या टॉप 8 मध्ये नरेंद्र मोदी स्थान मिळवता आले नाही. टॉप 8 मधून पश्चिम आफ्रिकात पसरलेल्या 'इबोला' व्हायरसने पीडित लोकांची दिवसरात्र सेवा करणार्‍या 'इबोला नर्सिंग स्टाफ'ला पर्सन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी ‍निवड करण्यात आली.

अमेरिकेतील फर्ग्युसनमधील आंदोलक, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, चीनमधील 'अलिबाबा'चे जॅक मा, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि इराकी कुर्दिश लीडर मसूद बरजानी, सिंगर टेलर स्विफ्ट आणि एनएफएलचे कमिश्‍नररॉजर गुडेल हे स्पर्धेत होते. अखेर 'इबोला नर्सिंग स्टाफ'ची 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषणा करण्यात आली.
दरम्यान, इबोला व्हायरसमुळे आतापर्यंत सात हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मार्च महिन्यात गिनीमध्ये इबोलाचा पहिला रुग्ण आढळला होता. 16 हजार लोकांना इबोलाची लागण झाली आहे. इबोला नर्सिंग स्टाफने आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांची दिवसरात्र सेवा करत आहेत.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'टाइम' च्या Person of the Year ची छायाचित्रे...