आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ebola News In Marathi, Divya Marathi, United Nations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Ebola चा कहर, 1 हजार 900 जणांचा घेतला बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पश्चिम आफ्रिकेतील इबोला विषाणुशी लढण्‍यासाठी 60 कोटींची गरज आहे, असे संयुक्त राष्‍ट्राने (यूनो) गुरुवारी सांगितले. आतापर्यंत विषाणुंने 1 हजार 900 लोकांचा बळी घेतला आहे. गिनीच्या इतर भागात इबोला पसरत आहे, असा इशारा युनोने दिला.
संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात 400 लोकांना आपले जीव गमवावे लागले, असे बुधवारी युनोने स्पष्‍ट केले. इबोलाचा पहिला रुग्ण गिनी या पश्चिम आफ्रिकेतील देशाच्या आग्नेय भागात आढळला. हेमरिज ताप लायबेरिया, सिएर लिओन, नायजेरिया आणि सेनेगल येथे पसरला आहे.
अद्याप इबोलावरील लस आणि उपचार उपलब्ध नाही. प्रायोगिक लस कॅनडा जागतिक आरोग्य संघटनेला आफ्रिकेतील रुग्णांसाठी देण्‍यास तयार आहे. पण कशा पध्‍दतीने त्याची वाहतूक करायची याबाबत गूढ कायम आहे.