आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियाहून भारतात येणा-या महिलेचा इबोलाने मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबी - कॅन्सरच्या उपचारांसाठी नायजेरियाहून भारतात येणा-या एका महिलेचा इबोलाने मृत्यू झाला. तिच्या तपासणीत इबोलासदृश लक्षणे आढळली होती.आरोग्य अधिका-यांनी सांगितले, अबुधाबी आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर या महिलेची प्रकृती अचानक बिघडली. सोमवारी ती भारतात येण्यासाठी निघणार होती.
विमानतळावर या महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. पाच डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही महिलेचे प्राण वाचू शकले नाहीत. इबोला या संसर्गजन्य रोगामुळे आफ्रिकी देशांमध्ये आतापर्यंत 1,145 जणांना मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही ललितकुमार या व्यक्तीला इबोलाची लक्षणे दिसल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. इबोलामुळे आफ्रिकी देशात 1,145 जणांचा मृत्यू झाला.