न्यूयॉर्क - इबोलाबाबत योग्य पावले उचलली जात आहे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी रविवारी( ता. 9 ) सांगितले. इबोला विषाणूने थैमान घातलेल्या पश्चिम आफ्रिकेतील मृतांच्या संख्येत घट झालेली आहे. जोपर्यंत आजार बरा होत नाही तोपर्यंत जागतिक समुदायाने एकदिलाने लढा द्यावे, असे आवाहन मून यांनी केले आहे.
इबोलाचे केसेस लायबेरिया, गिनी आणि सिएरा लिओनमध्ये हळुहळू कमी होत आहे. ती जगासाठी चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी कृत्याने सुरक्षित दफन, उपचार सुविधा आणि समाज एकत्रिकरणातून सध्याचा फायदा मिळत आहे, असे रविवारच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या लेखात बान की मून यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या इबोला इमर्जन्सी रिस्पॉन्सच्या ( यूएनएमईईआर) माध्यमातून इबोला संकट उभ्या राहिलेल्या देशांना आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे. जानेवारी 2015 मध्ये इबोलावरील प्रायौगिक लस पाश्चिम आफ्रिकेत वाटप केले जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.