आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोलाची माणसावरील चाचणी यशस्वी, अमेरिकत लस तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ऑक्सफर्ड विद्यापीठात इबोला लसची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. लसने सुरक्षितता आणि रोग प्रतिकार शक्तीला चांगला प्रतिसाद दिला आहे. इबोला लसीचे संशोधन करणा-या पथकाचे नेतृत्व ऑर्क्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर संस्थेचे प्राध्‍यापक अँड्रियन हिल करत आहे. इबोला लसने चांगला प्रतिसाद दिला.तसेच अपेक्षेपेक्षा अधिक सुरक्षित आहे, असे प्राध्‍यापक हिल यांनी सांगितले.

पश्चिम आफ्रिकेत इबोला लसचा वापर केला जाऊ शकतो. लस अमेरिकेची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्द आणि औषध कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लिनने विकसित केले आहे. चाचणी करिता लसचे डोस मोठ्याप्रमाणावर लायबेरियात पाठवण्‍यात आले आहे. इबोला लसचा प्रयोग चिम्पांझीवर करण्‍यात येत असून चाचणीत प्रतिकार शक्ती निर्माण करत असल्याचे दिसत आहे.