आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economics Nobel Declared To Fama, Shilar And Hansen

फामा, शिलर, हॅनसेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्‍कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार तीन अमेरिकी प्राध्यापकांना जाहीर झाला आहे. शेअर बाजारातील चढ-उतारांचे आकलन करण्याचा फॉर्म्युला शोधून काढल्याबद्दल शिकागो विद्यापीठातील लार्स पीटर हॅनसेन, युजिन फामा आणि येल विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट शिलर यांचा सन्मान झाला आहे. यंदाच्या पुरस्काराची 7.34 कोटी रुपयांची रक्कम तिन्ही अर्थतज्ज्ञांना विभागून देण्यात येईल.


युजिन फामा यांच्यानुसार आगामी काही दिवसांत शेअर्सच्या मूल्याचा अंदाज लावणे अशक्य आहे. कारण की नवनवीन माहिती अत्यंत वेगाने गोळा होत असते. रॉबर्ट शिलर यांनी 1980 मध्ये सांगितले, आगामी वर्षांत शेअर्सच्या मूल्याचे अनुमान लावले जाऊ शकत नाही. मात्र लाभांशाच्या तुलनेत शेअर्सच्या मूल्यात अधिक चढ-उतार कायम येत असतात. लार्स पीटर हॅनसेन यांनी मालमत्ता मूल्यविषयक सिद्धांताच्या पडताळणीसाठी नवे सांख्यिकीय मॉडेल विकसित केले. ते मालमत्तेचे मूल्य ठरवण्याच्या सिद्धांतासाठी अचूकपणे काम करते