आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ed Snowden Was Considering Marrying His Beautiful Ballerina Girlfriend

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थाची पोलखोल करणारा हाँगकाँगमधूनही \'बेपत्ता\', प्रेयसी त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची गुप्तचर संस्था 'एनएसए'ची पोलखोल केल्यानंतर हाँगकाँगमध्ये लपून बसलेल्या अ‍ॅड स्नोडेनची प्रेयसी लिंडसे मिल्स अतिशय त्रस्त आहे. स्नोडेन ज्या पद्धतीने पळून गेला आहे त्यामुळे, आपली फसवणूक झाल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

दरम्यान, स्नोडेन हाँगकाँगमधूनही बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत आहेत. सॅनफ्रांन्सिस्को येथे राहात असलेल्या त्याच्या वडीलांनी त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

स्नोडेनने 'एनएसए' आणि 'सीआयए' या गुप्तचर संस्थांचे कार्य कसे चालते याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याने अमेरिकेचे शत्रूत्व ओढवून घेतले आहे. जगभर चर्चा होत असलेल्या या घटानांचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे, याबद्दल मिल्सने सोमवारी ब्लॉग लिहिला. यात तिने गेल्या चार वर्षात स्नोडेनसोबतच्या क्षणांना उजाळा दिला आहे. तिने लिहिले आहे की, 'माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याच्यासोबत मी जगाचा कोपरा न् कोपरा फिरले. मला त्याच्याशी लग्न करायचे होते. मात्र, त्याने अर्ध्यातच साथ सोडली. आता मला समुद्रात एकाकी सापडल्यासारखे वाटत आहे. मी हे सर्व लिहित असताना की-बोर्ड अश्रूंनी ओला झाला आहे.'
स्नोडेनचा विरह मिल्सच्या जिव्हारी लागला आहे. त्याच्या सोबतची अनेक छायाचित्रेही तिने पोस्ट केली आहेत.
ती लिहिते, एकेकाळी मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, आणि आता निरोपाचे दोन शब्दही त्याच्याशी बोलता येत नाहीत. कदाचित आयुष्य असेच असते.

मिल्स आणि स्नोडेन यांचे २००९ पासून संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो हाँगकाँगमध्ये पळून गेला आहे. मिल्सच्या ब्लॉगवरून त्या दोघांच्या संबंधाबद्दल माहिती मिळते. तर, आपण फसवले गेलो याने त्रस्त असलेल्या मिल्सने खासगी छायाचित्रही पोस्ट केली आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मिल्सची छायाचित्रे.