आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Edward Snowden News In Marathi, American Spying, Electronic Servilance

संपूर्ण लोकसंख्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलियन्सच्या निगराणीखाली, स्नोडेनचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो - काही विशिष्ट व्यक्तींवर नजर ठेवण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आता पृथ्वीवर असलेली संपूर्ण लोकसंख्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलियन्सच्या निगराणीखाली आहे, असा दावा अमेरिकी हेरगिरीचे बिंग फोडणा-या एडवर्ड स्नोडेनने केला आहे. कॅनडामध्ये शुक्रवार रात्री इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलियन्स या विषयावर चर्चासत्र झाले. त्यामध्ये स्नोडेनने व्हिडिओ लिंकद्वारे भाग घेतला होता. स्नोडेन सध्या रशियामध्ये आश्रयाला आहे.

या चर्चासत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक निगराणीच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंवर चर्चा झाली. दहशतवादाला रोखण्यासाठी अशा स्वरूपाच्या गुप्तचर यंत्रणांचा आणि त्या मार्गांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिका अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे माजी संचालक मायकेल हेडन यांनी मांडली.