आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Edward Snowden Problems Increased Due To Equadore Stand

इक्वेडोरच्या भूमिकेमुळे एडवर्ड स्नोडेनच्या अडचणीत भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - अमेरिकेच्या जागतिक हेरगिरीचा गौप्यस्फोट करणारा व्हिसल ब्लोअर एडवर्ड स्नोडेनचे भवितव्य आता रशियाच्या दयेवरच अडकून पडले आहे. मॉस्कोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण कोणतीही मदत करणार नाही, असे इक्वेडोरने स्पष्ट केल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे.

स्नोडेन मॉस्को किंवा अन्य देशांतील इक्वेडोरच्या दूतावासात पोहोचल्यानंतरच त्याच्या शरणागतीच्या याचिकेवर विचार करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती त्या देशाचे राष्ट्रपती राफेल यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडेन यांच्याशी चर्चेदरम्यान दिली. स्नोडेन सध्या ‘नो मॅन्स लँड’मध्ये अडकून पडला आहे. अमेरिकेने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. इक्वेडोरकडून त्याला चुकीने प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे, असेही इक्वेडोरने स्पष्ट केल्यामुळे मॉस्को विमानतळावरून बाहेर पडताक्षणीच त्याला अटक केली जाऊ शकते.