आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Effects Of Nuclear War Between India And Pakistan On The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-पाक अणुयुद्ध आणि जगाची होरपळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झालेच तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. अणुयुद्धामुळे या दोन देशांमध्ये प्रचंड विध्वंस तर होणार आहेच, पण त्याची झळ अन्य देशांनाही सोसावी लागणार आहे.
व्हिस्कोंसिन वैद्यकीय विद्यापीठ आणि रटगर्स विद्यापीठाच्या संशोधकांनी भारत आणि पाकिस्तानमधील अशाच अणुयुद्धाची कल्पना केली आहे. त्यामध्ये दोन्ही देश परस्परांवर किमान 50 अणुबॉम्ब टाकतात. या कल्पनेनुसार अशा अणुयुद्धाचे परिणाम भयंकर आणि आश्चर्यचकित करणारे आहेत. या संशोधकांनी या अणुयुद्धाच्या पर्यावरणावर होणा-या परिणामांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते या अणुयुद्धातून निघणा-या धुराच्या लोटाचा (सूट) परिणाम व्यापक असेल आणि अख्ख्या जगालाच त्याचे चटके दीर्घकाळ सोसावे लागतील.

असे होतील भयंकर परिणाम
युद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरातून निघालेल्या धुराचे लोट (सूट) पसरल्यामुळे पृथ्वीला पूर्ण सूर्यप्रकाश मिळू शकणार नाही.
तापमानात घट, वातावरणात बदल आणि पिकांच्या उत्पादनासाठी पोषक काळात घट अशी परिस्थिती निर्माण होईल.
उपाययोजना करण्याची संधीही मिळणार नाही. ग्रीन हाऊस इफेक्टपेक्षाही विध्वंसक असेल.
पिकांचे उत्पादन घटल्यामुळे जगात अन्नधान्य टंचाईचे गंभीर संकट. व्यापारी संबंधात ताणतणाव

अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातील कृषिप्रधान प्रदेशात मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात लक्षणीय घट होईल. मक्याचे उत्पादन 10 ते 40 टक्के आणि सोयाबीनचे उत्पादन 20 टक्के घटणार. हा परिणाम एक दशकापेक्षाही अधिक काळ टिकून राहील.

चीनमध्ये तांदळाच्या उत्पादनात प्रचंड घट होणार. पहिल्या चार वर्षात 21 टक्क्यांपर्यंत आणि त्यापुढील सहा वर्षांपर्यंत 10 टक्क्यांपर्यंत तांदळाच्या उत्पादनात घट नोंदली जाईल.