आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egypt Citizen Come Together Against The Momamd Mursi

मोहंमद मुर्सी यांनी पद सोडावे, अशी मागणी करत सर्वसामान्य जनता इजिप्तमध्‍ये रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तमध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळाले. राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांनी पद सोडावे, अशी मागणी करत देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले असून हिंसाचारात सात जण ठार, तर शेकडो जखमी झाले. दरम्यान, विरोधी पक्षाने मुर्सी यांना पायउतार होण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे.
मुर्सी यांच्या राजीनाम्यासाठी तहरीर चौकात हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानासमोर संतप्त नागरिकांनी रविवारी रात्रीपासून ठिय्या मांडला आहे. तामरूद चळवळीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पद सोडावे, असा इशारा आम्ही मुर्सी यांना दिला आहे. दरम्यान, हिंसाचाराचा मार्ग सोडून चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


मुख्यालयावर हल्ला
कैरोमधील मुस्लिम ब्रदरहुडच्या मुख्यालयावर सोमवारी पहाटे निदर्शकांनी जोरदार हल्लाबोल केला. सहा मजली इमारतीला पेटवून देण्यात आले. पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. इमारतीवरील संघटनेचा फलक काढून इजिप्तचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आल्याचे दिसून आले. या वेळी धुमश्चक्रीत 2 ठार झाले.