आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Egypt Former President Hosni Mubarak News In Marathi, DIvya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजून १.६० लाख कागदपत्रे वाचणे बाकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - इजिप्तच्या न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्याविरोधील खटल्याचा निर्णय लांबवला आहे. या प्रकरणातील सुमारे १ लाख ६० हजार कागदपत्रे अद्याप वाचायची बाकी असून आतापर्यंत फक्त ६० टक्के निकालच लिहिला गेला असल्याचे न्यायमूर्ती महमूद कामेल अल रशिदी यांनी शनिवारी सांगितले.

या प्रकरणाचा निकाल आता २९ नोव्हेंबरला लागण्याची शक्यता आहे. शनिवारी याप्रकरणी न्यायाधीशांच्या घरी ठेवलेल्या १ लाख ६० हजार पानांची स्क्रीन करण्यात आलेली डॉक्युमेंटरी न्यायालयात सादर करण्यात आली. २०११ मध्ये त्यांच्याविरोधात निदर्शने करत असलेल्या सुमारे ८५० लोकांची हत्या केल्याचा आरोप होस्नी मुबारक यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांचे पुत्र गमाल आणि अला, तत्कालीन गृहमंत्री हबीब अल अदली हेसुद्धा आरोपी आहेत.

इजिप्तवर ३० वर्षांपर्यंत राज्य करणारे होस्नी मुबारक यांना २०११ मध्ये पदावरून हटवण्यात आले होते. मुबारक यांना शनिवारी हेलिकॉप्टरमधून न्यू काहिरा पोलिस अकादमीत आणण्यात आले. त्या वेळी त्यांच्या समर्थकांनी तसेच विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी
केली होती.