आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egypt Police Clashes With Football Fans, Latest News In Marathi

VIDEO : फुटबॉल सामन्‍यापूर्वी प्रेक्षक आणि पोलिसांत हाणामारी, 30 जणांचा मृत्‍यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहिरा - इजिप्‍तची राजधानी काहिरामध्‍ये पोलिस आणि फुटबॉल चाहत्‍यांमध्‍ये झालेल्‍या तुंबळ हाणामारीत 30 जणांचा मृत्‍यू झाला आहे. ही घटना रविवारी प्रीमियर लीग फुटबॉल सामन्‍यापूर्वी घडली.
जमालेक आणि एनपी फुटबॉल क्लब दरम्‍यान हा सामना एअरफोर्स स्‍टेडियमवर खेळला जाणार होता. हा सामना पाहण्‍यासाठी फुटबॉल चाहत्‍यांनी चांगलीच गर्दी केली होती. त्‍यांना बाहेर काढण्‍यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. फुटबॉल चाहत्‍यांना मारहाण केल्‍याने संतप्‍त झालेल्‍या जमावाने पोलिसांवर प्रतिहल्‍ला केला. कुण्‍या अज्ञात व्‍यक्‍तीने पोलिसांची कार पेटून दिली. अशी माहिती एका फुटबॉल प्रेमीने सांगितली आहे.
'जमालेक फुटबॉल क्लबचे काही प्रेक्षक तिकिटाशिवाय मैदानात घुसण्‍याचा प्रयत्‍न करत होती. तसेच सुरक्षा रक्षकांवर दबाव टाकत होती. त्‍यांना पांगविण्‍यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्‍या नळकाड्यांचा वापर केला गेला. अशी माहिती इजिप्‍त पोलिसच्‍या वरिष्‍ठ अधिका-याने दिली.
फुटबॉल खेळ इजिप्‍तमध्‍ये फारच लोकप्रिय आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2012 प्रीमियर लीग सामन्‍यानंतर अशीच घटना घडली होती. त्‍यामध्‍ये 70 हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, पोलिस आणि फुटबॉल चाहत्‍यांत उसळलेल्‍या दंगलीची छायाचित्रे.. अंतीम स्‍लाइडवर VODEO .