आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एड्सवर औषध तयार केल्याचा इजिप्तचा दावा, मागितली 6 महिन्यांची मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहिरा - इजिप्तच्या सैन्याने जीवघेण्यास एड्स आणि हेपेटायटिस-सी चे निदान करून त्यावर उपचार करणारे डिव्हाइस तयार केल्याचा दावा केला आहे. मात्र ते सर्वांसमोर आणण्यापूर्वी त्याची चाचणी घेण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सैन्याने म्हटले आहे. याआधी सैन्याने हे डिव्हाईस सोमवारी सर्वांसमोर आणणार असल्याचे म्हटले होते.

काहिरा येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सैन्याच्या एका डॉक्टरने याबाबात माहिती दिली. सर्वजनिक करण्यापूर्वी या डिव्हाईसच्या आणखी काही चाचण्या घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्‍टरांनी या डिव्हाइसच्या हेपेटायटिस-सीच्या सुमारे 80 रुग्णांवर चाचण्या घेतल्या आहेत.

वैज्ञानिकांनी आधीच फेटाळले आहेत दावे
डेली मेलच्या एका बातमीनुसार फेब्रुवारी महिन्यातच इजिप्तच्या सैन्याच्या हा दावा शास्त्रज्ञांनी फेटाळला होता. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत इजिप्तच्या लष्कराच्या इंजीनिअरिंग एजंसीच्या प्रमुखांनी एक चमत्कारी शोध लावल्याचा दावा केला होता. या टीमने तयार केलेल्या डिव्हाइसच्या मदतीने हेपेटायटिस आणि इतर व्हायरसची रक्तांचे नमुने न घेताच चाचणी करता येईल तसेच या आजारांपासून रक्षण करता यावे म्हणून रक्ताचे शुद्धीकरणही करता येईल असा दावा केला होता. मात्र, वैज्ञानिकांनी हे दावे फेटाळले होते.
इजिप्तमध्ये अपेक्षा वाढल्या
या दाव्यानंतर इजिप्तमध्ये मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे हेपेटायटिस-सी हा आजार याठिकाणी एक मोठी डोकेदुखी बनला आहे. काही सर्व्हेक्षणांमधील दाव्यानुसार 8 कोटी 60 लाख लोकसंख्या असलेल्या इजिप्तमध्ये सुमारे 10 टक्के लोकांना या आजाराने ग्रासले आहे.
फोटो: प्रतिकात्‍मक