आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये सत्तापालट, मंसूर राष्टाध्यक्ष; महम्मद मुर्सी लष्कराच्या तब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष आदली मंसूर यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष महम्मद मुर्सी यांना पदावरून दूर केल्यानंतर इजिप्तचे मुख्य न्यायाधिश आदली महमूद मंसूर यांना सत्तेची सूत्रे मिळाली आहेत. मंसूर यांच्या नावाची घोषणा लष्कर प्रमुख अब्देल फताह यांनी केली. लष्कर प्रमुखांचे म्हणणे आहे, की लष्कराला देशावर राज्य करण्याची इच्छा नाही. इजिप्तच्या शेजारी राष्ट्रांनाही चिंता करण्याची गरज नाही कारण ही लष्करी राजवट नाही.

याआधी लष्कर प्रमुखांनी दिलेल्या अल्टिमेटमची मदत संपल्यानंतर राष्ट्राध्यक्ष महम्मद मुर्सी यांची सत्तापालट करत देशाची जबाबदारी मुख्य न्यायाधिशांच्या हाती दिली होती. मुर्सी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. इजिप्तच्या सैन्याने देशाचे संविधान बरखास्त केले आहे. आता लवकरच निवडणूका घेतल्या जातील अशी घोषणा केली आहे. मुर्सींच्या राजीनाम्याची मागणी करत असलेल्या देशातील लाखो लोकांनी लष्कराच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.