कैरो - मिशी असावी नत्थू लालसारखी आणि दंड असावे मुस्तफा इस्माइलसारखी. इजिप्तच्या मुस्तफा इस्माइल याचे दंड सर्वात मोठे असल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. 26 वर्षांच्या इस्माइलच्या दंडांचा आकार 31 इंच इतके आहे. मात्र यामागे 10 वर्षांची अविरत मेहनत आहे. आपल्या दंडांचा आकार वाढवण्याचे भूत इस्माइलच्या डोक्यात शिरले होते. त्यामुळे त्याने इजिप्त सोडले आणि अमेरिकेत येऊन राहू लागला. येथेच त्याने आपले पिळदार बाहु तयार केले आहे.
आहार पण आहे खास
इस्माइल आपल्या दंडांची विशेष काळजी घेत असतो. त्यासाठी तो दररोज 3 पौंड चिकन, 1 पौंड मासे, 4 कप बदाम, 3 लिटर प्रोटीन शेक आणि 2 गॅलन पाणी घेत असतो.
अशी बनवले बायसेप्स
इस्माइलचे बाहु दोन किंवा तीन वर्षांमध्ये तयार झालेले नाही. यासाठी त्याला दहा वर्षे लागली. मागील 10 वर्षांपासून दररोज सकाळ-संध्याकाळ जवळ-जवळ प्रत्येकी चार तास जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा. तो 500 पौंड वजन उचलतो. मला माझ्या बाहुंवर खूप प्रेम आहे, असे इस्माइल सांगतो. वजनाबरोबर खेळायला खूप आवडते, असे इस्माइल म्हणतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा मुस्तफ इस्माइलचे छायाचित्रे...