(फाइल फोटो- इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक)
काहिरा- इजिप्तमधील एका कोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची हत्येप्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. होन्सी मुबारक यांच्यावर 2011 साली आंदोकलांच्या हत्येचे षडयंत्र रचण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. उल्लेखनिय म्हणजे 2011 मध्ये झालेल्या जनआंदोलनामुळे मुबारक यांच्या तीन दशकांची सत्ता संपुष्ठात आली होती. 86 वर्षीय होस्नी मुबारक सध्या तुरुंगात असून त्यांना सरकारी संपत्तीतील गैरव्यवहारप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाली आहे.
होस्नी मुबारक यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर काहिरामध्ये त्यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा होत आहे. गॅस निर्यातप्रकरण तसेच भ्रष्टाचाराच्या अनेक खटल्यात होन्सी मुबारक यांना कोर्टाने क्लीन चिट दिली आहे.
आज (शनिवार) झालेल्या सुनावणीत हुस्नी यांचे दोन मुले, मुख्य सुरक्षा अधिकारी, 6 सुरक्षा रक्षक आणि व्यावसायिक हुसेन सलीम यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान, मुबारक यांना 2012 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, होस्नी मुबारक यांनी वरच्या कोर्टात अपील केल्याने त्यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, होस्नी मुबारक यांचा निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आनंद साजरा करताना होस्नी समर्थक...