आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egyptian Presidential Candidate Sisi: Muslim Brotherhood 'finished'

इजिप्तमध्ये ब्रदरहूडचे अस्तित्वच धोक्यात, माजी लष्करप्रमुख सिसींचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर इजिप्तमधून मुस्लिम ब्रदरहूडचे अस्तित्वच संपुष्टात येईल, असे इजिप्तचे माजी लष्करप्रमुख अब्दुल फत्तह अल सिसी यांनी म्हटले आहे. सिसी यांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी पहिल्यांदाच खासगी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
इजिप्तमध्ये 26 आणि 27 मे रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सिसी यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. सीबीसी आणि ओएनटीव्ही या दोन वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सिसी यांनी म्हटले आहे की, मी त्यांचा (मुस्लिम ब्रदरहूडचा) पूर्णत: सफाया केलेला नसून इजिप्तच्या लोकांनीच त्यांचे अध:पतन घडवून आणले आहे. मुर्सी यांना सत्तेवरून दूर करताना आणि मुस्लिम ब्रदरहूडवर निर्बंध लादताना आपली कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती, असे सिसी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण लष्कराचे उमेदवार नाही. इजिप्तचा कारभार चालवताना लष्कराची कोणतीही भूमिका असणार नाही, असे स्पष्ट करतानाच सिसी यांनी आंदोलनावर कडक निर्बंध लादणा र्‍या कायद्याचेही जोरदार समर्थन केले.
मुर्सी समर्थकांचे खच्चीकरण
मुर्सी यांना पदावरून हटवल्यानंतर 1000 हून अधिक मुर्सी समर्थक मारले गेले आहेत. हिंसाचार, खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली 1000 मुर्सी समर्थकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यात मुस्लिम ब्रदरहूडचा नेता मुहमद बैदीचाही समावेश आहे.

सिसींनीच केला होता मुर्सींचा घात
इजिप्तचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष मुहमद मुर्सी यांना लष्करप्रमुख या नात्याने अल सिसी यांनीच पदच्युत केले होते. मुर्सी हे फ्रिडम अँड जस्टिस पार्टीचे नेते होते. मुस्लिम ब्रदरहूड या मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनेने पडद्यामागे राहून त्यांना निवडून आणले होते. सत्तेत आल्यानंतर मुर्सी यांनी उत्तर आफ्रिकेतील इस्लामी देशांची एकजूट घडवून आणण्याचा आणि ब्रदरहूडच्या विरोधकांना संपवण्याची मोहीमच हाती घेतली होती.